माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमतावृद्धी जिल्हास्तरीय प्रशिक्षण (TOT) आणि तालुकास्तरीय प्रशिक्षण आयोजन करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत.

 माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमतावृद्धी जिल्हास्तरीय प्रशिक्षण (TOT) आणि तालुकास्तरीय प्रशिक्षण आयोजन करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत.



उपरोक्त संदर्भांकित विषयानुसार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्र पुणे या कार्यालयामार्फत संदर्भ क्र. ४ अन्वये राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या क्षमता वृद्धी - जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आणि तालुकास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन दिलेल्या वेळापत्रकानुसार करण्याबाबत कळविण्यात आले होते. तथापि इयत्ता १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षांच्या अनुषंगाने परीक्षा कालावधीमध्ये शासकीय आणि अनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक यांना परिरक्षक, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षण इत्यादी कामकाजासाठी परीक्षा मंडळाकडून नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत.

सदर पार्श्वभूमीवर तालुकास्तर प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करताना आणि प्रशिक्षणार्थी म्हणून आदेश देताना मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि शिक्षक यांच्या सदर कामकाजाचा कालावधी लक्षात घेऊन प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करावे. ज्या प्रशिक्षणार्थी मुख्याध्यापक, शिक्षक यांना अशा नियुक्त्या नाहीत अशा प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण प्रथम टप्प्यात आणि जसजसे प्रशिक्षणार्थी या परीक्षा कामकाजातून कार्यमुक्त होतील या बेताने उर्वरित प्रशिक्षण वर्गांचे आयोजन आपल्या स्तरावरून करण्यात यावे. कोणत्याही प्रकारे बोर्ड परीक्षांच्या व्यवस्थापनामध्ये प्रशिक्षणामुळे अडथळा येणार नाही याची जिल्हा व तालुका प्रशासनाने सर्वोतोपरी दक्षता घ्यावी तसेच २० मार्च २०२४ पर्यंत तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील १०० टक्के शिक्षकांचे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने पूर्ण होईल याकडेही लक्ष द्यावे. (मा. संचालक यांच्या मान्यतेने )


अधिक  माहिती साठी खालील परिपत्रक वाचा 

download

टिप्पणी पोस्ट करा

11 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .