“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियानाबाबत ....शैक्षणिक घोषवाक्य,मा. मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्रासोबत पालक, विदयार्थी यांची सेल्फी,वाचन प्रतिज्ञा:सहभाग कसा घ्यावा ? अभिप्राय कसा नोंदवावा ?

 “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियानाबाबत ....

शैक्षणिक घोषवाक्य,मा. मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्रासोबत पालक, विदयार्थी यांची सेल्फी,वाचन प्रतिज्ञा :

सहभाग कसा घ्यावा ? अभिप्राय कसा नोंदवावा ?






(विदयार्थ्यांनी स्वहस्ताक्षरातील घोषवाक्य अपलोड करणे.)

पोर्टल वरील सूचना
(अधून मधून स्वत: पोर्टल चेक करणे.)



घोषवाक्य नमुना


सेल्फी नमुना 






वाचन प्रतिज्ञा




खालील प्रत्येक बाबी पूर्णपणे, अचूक व स्पष्टपणे नमूद करावे.

  1. १) भ्रमणध्वनी क्रमांक.
  2. २) कॅपच्या (Captcha) दिलेल्या जागेत व्यवस्थित टाकावा.
  3. ३) विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव.
  4. ४) आपल्या शाळेचे पूर्ण नाव.
  5. ५) दिलेल्या यादी मधून आपल्या शाळेचा जिल्हा व तालुका निवडावा.
  6. ६) शिक्षणाविषयी आपले घोषवाक्य कमाल १० शब्दात तयार करावे, Text मध्ये नमूद करावे व स्व:हस्ताक्षरात लिहावे, त्याचे छायाचित्र अपलोड करावे.
  7. ७) विदयार्थी, पालक व मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या संदेश रूपी पत्रासमवेतचा सेल्फी अपलोड करावा.
  8. ८) मा. मुख्यमंत्री यांच्यासमवेत सहभोजन करीता प्रत्येक जिल्हयातून निवड करताना, सेल्फी व घोषवाक्य या दोन मुद्दयांवरून मूल्यांकन केले जाणार आहे.
  9. ९) माहिती भरून झाल्यावर संपूर्ण माहिती आवश्यकता असल्यास तपासावी व Submit बटणवर क्लिक करावे.
  10. सहभाग घेण्यासाठी येथे click करा.

राज्यामध्ये “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या उपक्रमातंर्गत शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी मोठया उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. राज्यातील १ लाख १ हजार शाळांनी आजमितीस सहभाग नोंदविला असून शाळा, विदयार्थी, शिक्षक व पालकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानातंर्गत मा.मुख्यमंत्री महोदय यांनी विदयार्थ्याना उद्देशून लिहिलेले संदेश पत्र हे सर्व शाळांमधील २ कोटी ११ लाख मुलांपर्यंत पोहचविण्यात आलेले आहे. या पत्रामध्ये मा.मुख्यमंत्री महोदय यांनी राज्यातील बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकला असून राज्यातील सर्व विदयार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानाचा प्रारंभ केला आहे.

राज्य शासनाने या अभियानांतर्गत www.mahacmletter.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळावर पुढीलप्रमाणे सहभाग विदयार्थ्यांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.

१. शैक्षणिक घोषवाक्य : अभियानाचा एक महत्वपूर्ण पैलू म्हणजे विदयार्थ्यांच्या स्वहस्ताक्षरातील घोषवाक्य अपलोड करणे.

. मा. मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्रासोबत पालक, विदयार्थी यांची सेल्फी : विदयार्थ्यांचे पालकांसमवेत मा. मुख्यमंत्री महोदयांचे संदेश पत्रांचा सेल्फी संकेतस्थळावर अपलोड करणे.

या दोन स्वतंत्र उपक्रमामधील सहभागी विदयार्थ्यांमधून प्रत्येक जिल्हयातून प्रथम क्रमांकावरील पात्र विदयार्थ्यांला रोख बक्षीस त्याला आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य व वर्गशिक्षक यांना मा. मुख्यमंत्री महोदय यांच्यासमवेत मुंबई येथे स्नेहभोजन कार्यक्रमाची संधी मिळणार आहे.

३. वाचन प्रतिज्ञा : प्रत्येक विदयार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वृध्दींगत होण्यासाठी 'वाचन सवय प्रतिज्ञा' मुलांनी घ्यावयाची आहे. त्यामुळे प्रत्येक विदयार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल तसेच विदयार्थ्यांकरीता उपरोक्त नमूद संकेतस्थळावर विदयार्थ्यांनी ऑनलाईन प्रतिज्ञा घ्यावयाची आहे.

याकरीता www.mahacmletter.in या संकेतस्थळावर या दोन उपक्रमांपैकी एक उपक्रमाचा व्हिडीओ अपलोड करावयाचा आहे. त्याकरीता या सोबत जोडलेल्या मॅन्युअल /फ्लोचार्ट प्रमाणे शाळास्तरापर्यंत सर्व विदयार्थ्यांना सूचना पोहच होतील याची दक्षता घेण्यात यावी. वरील एक ते तीन वरील उपक्रम संकेतस्थळावर दि.१७/०२/२०२४ ते दि. २५/०२/२०२४ या कालावधीमध्ये अपलोड करावयाचे आहेत. त्याप्रमाणे सोबत जोडलेला फ्लोचार्टनुसार अंतिम दिनांकापूर्वी उपक्रमाची माहिती अपलोड करण्याच्या सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून कार्यवाही पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.

         महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक बालकास शिक्षण गुणवत्तापूर्ण देण्यास राज्य शासन महत्वकांशी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे.  आजचे व उद्याचे सक्षम नागरिक म्हणून जीवन जगण्यास आपणास विविध प्रकारच्या ज्ञानाची गरज असते.  वाचन संस्कृतीचा विकास व्हावा. याकरीता आपणाकरीता शिक्षणविषयक घोषवाक्य व सेल्फी चा उपक्रम हाती घेतला आहे. आणि वाचन प्रतिज्ञाचा जागतिक विक्रम करण्याच्या पायरीवर आपण आहोत. 
आपण सर्वांनी सोबत च्या लिंकवर जाऊन आपला सहभाग नोंदविण्यास राज्य शासनाच्या वतीने आपणास अहवान करण्यात येत आहे. 
सहभाग लिंक 



सहभाग कसा घ्यावा ? फ्लोचार्ट

  • संकेतस्थळ www.mahacmletter.in ला भेट दयावी.
  • सहभाग घेण्यासाठी येथे click करा.
  • Register बटणावर क्लिक करावे. ↓
  • मोबाईल क्रमांक नमूद करावा.
  • पुन:श्च मोबाईल क्रमांक नमूद करावा.
  • कॅपचा (captcha) दिलेल्या जागेत व्यवस्थित टाकावा.
  • Continue बटणावर क्लिक करावे. ↓
  • शिक्षणाविषयीच्या घोषवाक्याचा फोटो अपलोड करणे तसेच सोबत दिलेल्या जागी मराठी /इंग्रजी मध्ये घोषवाक्य नमूद करावे.
  • Continue बटणावर क्लिक करावे. ↓
  • मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विदयार्थ्याना उददेशून लिहिलेल्या संदेश पत्रासमवेत सेल्फी, | पालक विदयार्थी व पत्र यांचा सेल्फी अपलोड करावा.
  • Continue बटणावर क्लिक करावे.

  • वाचन सवय प्रतिज्ञेचे वाचन करावे.
  • सहमत आहे V ची खुण करावी.
  • Submit वर क्लिक करावे.
  • Congratulations असा संदेश दिसेल म्हणजे आपला प्रतिसाद यशस्वी नोंदविला गेला आहे.

धन्यवाद


अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा


download


अधिक माहिती साठी खालील मार्गदर्शिका पहा







अभिप्राय बाबत पोर्टलच्या अधिकृत सूचना

आपल्या अभिप्रायचे फोटो अपलोड करण्याची सुविधादिनांक २६ फेब्रुवारी २०२४ सकाळी ९ : ०० वाजे पासून ते २७ 
फेब्रुवारी २०२४ सकाळी ९ : ०० वाजेपर्यंत सुरु असेल.




 
   अभिप्राय नोंदवण्यासाठी खालील प्रत्येक बाबी पूर्णपणे, अचूक व स्पष्टपणे नमूद करावे.

  1. १) भ्रमणध्वनी क्रमांक.
  2. २) कॅपच्या (Captcha) दिलेल्या जागेत व्यवस्थित टाकावा.
  3. ३) विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव.
  4. ४) आपल्या शाळेचे पूर्ण नाव.
  5. ५) दिलेल्या यादी मधून आपल्या शाळेचा जिल्हा व तालुका निवडावा.
  6. ६) अभिप्राय नोंदवतांना, स्व:हस्ताक्षरात शिक्षणाविषयी / मा. मुख्यमंत्री यांच्या पत्राविषयी प्रतिक्रिया कमाल ५० शब्दात नमूद करणे, त्याचे छायाचित्र अपलोड करणे.
  7. ७) माहिती भरून झाल्यावर संपूर्ण माहिती आवश्यकता असल्यास तपासावी व Submit बटणवर क्लिक करावे.
अभिप्राय नमुना 






फ्लो chart मार्गदर्शिका



अभिप्राय कसा नोंदवावा ?

असे पेज open होईल. खालील स्कीन पहा.

upload handwriting note photo ला click केल्यावर असे पेज open होईल.
  1. १) भ्रमणध्वनी क्रमांक.
  2. २) कॅपच्या (Captcha) दिलेल्या जागेत व्यवस्थित टाकावा. continue करावे.खालील स्कीन पहा.

  1. ३) विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव.
  2. ४) आपल्या शाळेचे पूर्ण नाव.
  3. ५) दिलेल्या यादी मधून आपल्या शाळेचा जिल्हा व तालुका निवडावा.continue करावे. खालील स्कीन पहा.


  1. ६) अभिप्राय नोंदवतांना, स्व:हस्ताक्षरात शिक्षणाविषयी / मा. मुख्यमंत्री यांच्या पत्राविषयी प्रतिक्रिया कमाल ५० शब्दात नमूद करणे, त्याचे छायाचित्र अपलोड करणे.
  2. ७) upload image करावी व Submit बटणवर क्लिक करावे.खालील स्कीन पहा.

congratulations असा मेसेज स्क्रीन वर दिसेल.  खालील स्कीन पहा.


आपली अभिप्राय नोंदवण्याची प्रक्रिया येथे पूर्ण होईल .धन्यवाद

अभिप्राय बाबत शिक्षण आयुक्तांच्या मार्गदर्शक सूचना परिपत्रक दि २४ फेब्रुवारी २०२४ नुसार

राज्यामध्ये “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या उपक्रमांतर्गत शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. राज्यातील १,०३,३३३ शाळांनी अभियानात सहभाग नोंदविला असून शाळा, विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. सदर अभियानांतर्गत मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले संदेश पत्र हे सर्व शाळांमधील 2 कोटी 11 लाख मुलांपर्यंत पोहचविण्यात आलेले आहे. या पत्रामध्ये मा. मुख्यमंत्री महोदय यांनी राज्यातील बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकला असून, राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानाचा प्रारंभ केलेला आहे.

राज्य शासनाने या अभियानांतर्गत www.mahacmletter.in हे संकेतस्थळ विकसित केलेले आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना शिक्षण विषयक अभिप्राय नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.

मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना उद्देशुन लिहीलेल्या पत्रातील मजकूर व शिक्षण विषयक अभिप्राय हस्ताक्षरात लिहून त्याचा फोटो उपरोक्त नमूद संकेतस्थळावर अपलोड करावयाचा आहे. यामधून प्राप्त अभिप्रायांचा विचार राज्याच्या शैक्षणिक धोरण निश्चितीकरणात केला जाणार आहे. शिक्षण विषयक अभिप्राय नोंदविण्याच्या प्रक्रीयेत सहभाग घ्यावा असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात येत आहे.

उपक्रमाचे नाव : Largest online photo album of “Handwritten Notes in 24 hours”.

कार्यपध्दती :

१) पालकांनी मा. मुख्यमंत्री महोदय यांचे पत्र मुलांना सोबत घेऊन वाचावयाचे आहे.

२) हे पत्र वाचून झाल्यावर त्यांनी छोटया वहीचे एक पान व एक बॉलपेन घ्यायचे आहे.

३) या पानावर मुलांनी बॉलपेनाने स्वत:च्या हस्ताक्षरात या पत्राविषयी त्यांचा शिक्षण विषयक अभिप्राय नमूद करणे अपेक्षित आहे. लहान वयोगटातील विद्यार्थ्यांना लेखन शक्य नसल्यास त्यांच्या पालकांच्या हस्ताक्षरात लेखन करता येईल. ज्या पालकांना लेखन करता येत नाही त्यांच्या वतीने अन्य व्यक्तींकडून लेखन करुन घेता येईल.

४) हा अभिप्राय ५ ते ६ ओळीमध्ये असावा.

५) अभिप्राय लिहून झाल्यावर पालकांनी अभिप्राय लिहिलेल्या पानाचा फोटो आपल्या मोबाईलच्या कॅमे-यात काढायचा आहे.

६) त्यानंतर शिक्षण विभागाच्या www.mahacmletter.in वेबसाईटवर जाऊन स्वत:च्या नावाने रजिस्ट्रेशन करणे अपेक्षित आहे.

७) त्यानंतर हस्ताक्षरातला अभिप्रायाचा फोटो अपलोड करावयाचा आहे.

याबाबत करावयाच्या कृतीबाबत फ्लोचार्ट सोबत जोडलेला असून त्याप्रमाणे सर्व शाळास्तरापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना सूचना पोहोच होतील याची दक्षता घेण्यात यावी. सदर उपक्रमाचा दि. २६.०२.२०२४ वेळ सकाळी ०९.०० ते दि. २७.०२.२०२४ सकाळी ०८.५९ आहे. सदर दिवशी अभिप्राय लिहिलेल्या पानाचा फोटो अपलोड करावयाचा आहे. त्यानुसार उपरोक्त सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून कार्यवाही पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.






टिप्पणी पोस्ट करा

62 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. 𝓐𝓭𝓪𝓻𝓼𝓱 𝓿𝓲𝓳𝓪𝔂 𝓼𝓲𝓰𝓿𝓪𝓷

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .