शिष्यवृत्ती परीक्षा 18 फेब्रुवारी 2024 पाचवी व आठवी अंतरिम निकाल

 शिष्यवृत्ती परीक्षा 18 फेब्रुवारी 2024 पाचवी व आठवी अंतरिम निकाल


आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.

विद्यार्थी निकाल स्वतंत्रपणे पाहण्यासाठी येथे click करा.

(विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी फक्त विद्यार्थी सिट/परीक्षा नंबर आवश्यक )


शाळा निकाल एकत्रित पाहण्यासाठी येथे click करा. 


शिष्यवृत्ती वेबसाईटवर सर्व माहिती पाहण्यासाठी येथे click करा.

        महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी चा अंतरिम निकाल शनिवार दि 30 एप्रिल २०२4  रोजी सायंकाळी  वरील परिषदेच्या वेबसाईट वर घोषित करण्यात आला आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या वरील लॉगिन मधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल वरील संकेतस्थळावर थेट पाहता येईल.
गुण पडताळणी व दुरुस्ती  

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. ३०/०४/२०२४ ते १०/०५/२०२४ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी दि. १०/०५/२०२४ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. तसेच शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र (शहरी / ग्रामीण) व अभ्यासक्रमात दुरूस्ती करावयाची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंती पत्र पूर्ण माहिती नमूद करून सदरचे पत्र puppsshelpdesk@gmail.com या ईमेलवर दि. १०/०५/२०२४ रोजीपर्यंत पाठविण्यात यावे.

विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा




टिप्पणी पोस्ट करा

40 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. वेदांत अनंत मोरे

    उत्तर द्याहटवा
  2. अनुष्का भानुदास पाटील

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .