पाठ्यपुस्तकांच्या रचनेतील बदलाबाबत-2024-25

पाठ्यपुस्तकांच्या रचनेतील बदलाबाबत 2024-25

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, 'बालभारती'


पहिली ते बारावी पर्यंतची सर्व माध्यमांची, सर्व विषयांची पाठ्यपुस्तके pdf मध्ये download करण्यासाठी येथे click करा.


शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५ साठी पाठ्यपुस्तकांच्या संदर्भाने झालेल्या बदलाबाबतची माहिती या परिपत्रकाद्वारे कळविण्यात येत आहे.

१) संदर्भीय परिपत्रकान्वये शैक्षणिक वर्ष २०२३ २०२४ (जून २०२३) पासून पथदर्शी स्वरूपात इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वीच्या विदयार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या तसेच सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट असलेली एकात्मिक स्वरूपातील पाठ्यपुस्तके एकूण ४ भागात उपलब्ध करून दिली आहेत. तसेच या संदर्भाने आवश्यक त्या सूचना आपणास कळविण्यात आलेल्या आहेत.

२) शैक्षणिक वर्ष २०२४ - २०२५ (जून २०२४) पासून राज्यातील सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित व अंशत: अनुदानित तसेच खाजगी व विना अनुदानित शाळांमधील इयत्ता १ ते ८ वीच्या विदयार्थ्यांसाठी गुजराती, कन्नड, तेलुगु, सिंधी, तमिळ व बंगाली या माध्यमांसाठी तसेच सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठ्यपुस्तकांची एकूण ४ भागांमध्ये विभागणी करून एकात्मिक स्वरुपातील पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील. या पाठ्यपुस्तकांमध्ये सरावासाठी आवश्यकतेनुसार वह्यांची पृष्ठे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. सबब शैक्षणिक वर्ष २०२४ २०२५ साठी एकूण दहा माध्यम व सेमी इंग्रजी विषयांची पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील.

३) इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वीच्या विदयार्थ्यांसाठी अनिवार्य विषयांच्या पाठ्यपुस्तकांची एकूण ४ भागांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. तसेच वैकल्पिक विषयांची पाठ्यपुस्तके स्वतंत्ररित्या उपलब्ध करून दिली जातील.

४) शैक्षणिक वर्ष २०२५ २०२६ साठी बालवाटीका, बालवाडी, अंगणवाडी तसेच इयत्ता १ ली व इयत्ता २ रीसाठी प्रस्तावित नवीन राज्य अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५ (जून २०२४) हे इयत्ता १ ली व इयत्ता २ री या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष राहील. त्यामुळे या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्यात यावी.

तरी वरीलप्रमाणे पाठ्यपुस्तकांची रचना व बदलाबाबतची नोंद राज्यातील सर्व अधिकृत पुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्था व इतर सर्व संबंधितांनी घ्यावी.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.