पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरे जाताना... या महत्वाच्या 25 बाबी लक्षात ठेवाच.....

 पाचवी आठवी  शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरे जाताना...या महत्वाच्या 25 बाबी लक्षात ठेवाच.....




१) परीक्षेला जाताना तुमचे हॉलतिकीट (Admit card ),चांगले चालणारे २ ते ३ ठळक बॉल पेन एकाच रंगाच्या घ्या. (काळ्या किंवा निळ्या रंगाच्या)

२) तुमच्या सोबत रूमाल असायला हवा, कारण तुमच्या तळ हाताला नेहमी घाम येत असतो .घामामुळे उत्तरपत्रिका खराब होईला नको म्हणून थोड्या थोड्या वेळाने तळहात पुसा आठवणीने.

३) तुमची पाण्याची बाटली बेंचवर ठेवू नका .तुम्हांला पाणी हवे असल्यास पेपर बाजूला करून पेपर वर पाणी पडणार नाही या पद्धतीने पाणी प्या.

४) पेपर सोडविताना तुम्हांला पूर्ण दीड तास वेळ घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा.गडबड करून पेपर लवकर सोडवू नका.वेळेचे नियोजन करा.

५) पेपर सोडविताना प्रत्येक प्रश्न  पूर्ण वाचा. त्यानंतरच प्रश्नाचे अचूक उत्तर पर्यायातून निवडा आणि महत्वाचे म्हणजे उत्तरपत्रिकेत त्याच प्रश्नाचा क्रमांक पाहून नंतरच तुमचा अचूक पर्याय रंगवा. (चूकून सुद्धा दुसऱ्या गोल मध्ये dot पण पडू देवू नका तुमचे ते उत्तर चूकीचे ठरू शकते.)

६) उतारा,कविता,जाहिरात आणि संवाद व्यवस्थित वाचून घ्या त्यानंतरच एक एक प्रश्न सोडवायला सुरूवात करा. प्रत्येक प्रश्न प्रश्नचिन्हापर्यंत व्यवस्थित वाचा. 
(प्रश्नातील आहे - नाही ,चूक - बरोबर ,अचूक - चूक correct -incorrect ,right -wrong ,रेखांकित -अरेखांकित हे महत्त्वाचे शब्द वाचूनच नंतर प्रश्न सोडवायला घ्या.)

७) जेव्हा तुमचे गणित, बुद्धिमत्ता विषयाचे उदाहरण सोडवून होईल तेव्हा प्रत्येक वेळेस रिचेक म्हणजेच परत तपासून घ्या कारण अशा वेळेतच सोपे उदाहरणे चूकत असतात.

८) बुद्धिमत्ता विषया मधील आकृत्या व्यवस्थित निरीक्षण करून सोडवा. (आरशातील प्रतिबिंब व पाणी म्हणजेच जल प्रतिबिंब यात गोंधळ करू नका.) संख्येतील परस्परसंबंध,संख्यामालिका व विसंगत पद ह्या प्रश्नांना थोडा वेळ जादा द्या हे प्रश्न मेरीट लावणारे असतात.

९) गणितातील प्रश्न सोडविताना सर्वात अगोदर एक लक्षात ठेवा गणितातील प्रत्येक प्रश्न सोडविल्याशिवाय उत्तर अंदाजे करू नका.कितीही सोपा प्रश्न असू द्या तो सोडवाच.

१०) कधी कधी सुरूवातीला 5 ते 6 प्रश्न खूपच सोपे येतात आणि आपण Relax होतो आणि उत्तरे तोंडी करायचा प्रयत्न करतो आणि इथेच खऱ्या चूका होत असतात हे लक्षात ठेवा.

११) शेवटी एकच म्हणेल तुम्ही वर्षभर केलेल्या अभ्यासाला दीड तासाच्या वेळात दोन पेपरमध्ये 75 प्रश्न तुम्ही  अचूक आणि कमी वेळात कसे सोडवाल यावर सर्व यश अवलंबून आहे.

१२) अर्ध्या तासात २५ प्रश्न सोडवा.

१३) प्रश्नचिन्ह येईपर्यंत प्रश्न वाचा. 

१४) चारही पर्याय वाचल्याशिवाय तुमचे उत्तर निश्चित करू नका. 

१५) प्रत्येक वेळी उत्तर पत्रिकेत उत्तराचा पर्याय रंगवताना प्रश्न क्रमांक व उत्तर पत्रिकेतील क्रमांक बरोबर असल्याची खात्री करा.

१६. प्रत्येक प्रश्न प्रश्नचिन्हापर्यंत व्यवस्थित वाचा.

१७. गणित कितीही सोपे वाटत असले तरी ते तोंडी न करता लिहूनच सोडवा.

१८. एखादा प्रश्नांचे उत्तर मिळत नसल्यास तेथेच थांबू नका, पुढील प्रश्न सोडवा.

१९. प्रश्न व उत्तरपत्रिकेतील गोल करावयाचा क्रमांक योग्य असल्याची खात्री करुनच पर्यायाला गोल करा.

२०. कोणतेही दडपण, भिती मनात न बाळगता पेपर सोडवा. 

२१. पहिला पेपर झाल्यानंतर कोणत्याही प्रश्नांबाबत चर्चा करु नका.

 २२. पेपर सोडविताना प्रत्येक प्रश्न पूर्ण वाचा. त्यानंतरच प्रश्नाचे अचूक उत्तर पर्यायातून निवडा. 

 २३. इ. 8वी साठी काही प्रश्नांच्या उत्तरात दोन पर्याय राहू शकतात. जिथे दोन पर्याय असतील तिथे दोन गोल रंगवा. 

सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा..!

(Disclaimer- शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाच्या सूचना असल्याने इथे दिल्या आहेत . सौजन्य Whats App) 

टिप्पणी पोस्ट करा

5 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .