जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत

 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत


ग्रामविकास विभागाने निर्गमित केलेल्या दि 30 नोव्हेंबर २०२३ च्या आंतर जिल्हा बदली परिपत्रकानुसार...... 

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीव्दारे करण्याबाबत सुधारित धोरण संदर्भाधीन दि. ०७/०४/२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आले आहे. तथापि, शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भाधीन दि. २१/०६/२०२३ च्या शासन निर्णयान्वय तसेच दि.०३/११/२०२३ रोजीच्या पत्रानुसार प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत.

(31)शासन निर्णय दि.०७/०४/२०२१ मधील परिच्छेद क्र.२.१ नुसार जे शिक्षक कर्मचारी दि. ३० जून २०२३ रोजी बदलीस पात्र असतील, अशा शिक्षकांनाच अर्ज भरण्याची संधी देण्यात यावी.

(ब)तसेच सन २०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते, परंतु आंतरजिल्हा बदलीप्रक्रीया राबवत असतांना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र असूनही रिक्त जागेअभावी त्यांना बदली मिळाली नव्हती. अशा शिक्षकांना सन २०२२ मध्ये भरलेल्यांना अर्जामध्ये जिल्हा बदलण्यास एडीट करण्यास संधी देण्यात यावी.

(क) मा. न्यायालयीन प्रकरणात व विभागीय आयुक्तांकडील अपील प्रकरणात बदल्यांबाबतचे स्पष्ट आदेश दिलेले असतील त्या शिक्षकांना संधी देण्यात यावी. तथापि, असे करतांना संबंधित शिक्षकांनी सदर न्यायालयीन / विभागीय आयुक्तांच्या आदेशाची प्रत अर्जासोबत पोर्टलवर सादर करणे आवश्यक आहे.

उपरोक्त (अ) मधील नमूद बदलीपात्र शिक्षकांसाठी रोष्टर (बिंदुनामावली) प्रसिध्द करण्याची व अवलोकनाची कार्यवाही करावी. तसेच बदलीपात्र शिक्षकांना अर्ज सादर करण्याची मुदत दि.०६/१२/२०२३ पर्यंत देण्यांत येत असून तद्नंतर बदलीची कार्यवाही सुरु करण्यात येईल. वरीलप्रमाणे सूचना सर्वसंबंधितांना निदर्शनास आणून देण्याची व त्यानुषंगाने पुढील कार्यवाही करण्याची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी दक्षता घ्यावी, ही विनंती

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा 

  for download click Here

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.