सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत

 सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत


ग्राम विकास विभागाने दि २२ नोव्हेंबर २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचना दिल्या आहेत कि ..

उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन दि.२७/१०/२०२३ च्या शासनपत्राचे कृपया अवलोकन करावे.

सन-२०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते, परंतु आंतरजिल्हा बदलीप्रक्रीया राबवत असतांना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र ठरले होते मात्र रिक्त जागा अभावी ज्यांना बदली मिळाली नव्हती, फक्त अशाच सन २०२२ च्या बदलीप्रक्रीयेमधील प्रतिक्षाधीन प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु करण्याच्या अनुषंगाने बिंदुनामावली बदली पोर्टल वर अपलोड करण्यासाठी आज दुपारी १२.०० वा. पासून Vinsys IT Services (I) Pvt. Ltd, व्दारे पोर्टल उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तरी सर्व जिल्हा परिषदांनी आपआपल्या जिल्ह्यातील बिंदुनामावली अपलोड करण्याबाबतची कार्यवाही तात्काळ सुरु करावी. तसेच ज्या जिल्हा परिषदांनी बिंदुनामावली यापुर्वी अपलोड केली असेल त्यांनी पुन्हा अद्ययावत बिंदुनामावली अपलोड करण्याची कार्यवाही करावी.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा.




Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .