सन २०२२ च्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्यांचे वेळापत्रक बाबत परिपत्रक दि १३ सप्टेंबर २०२३

सन २०२२ च्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्यांचे वेळापत्रक बाबत परिपत्रक दि १३ सप्टेंबर २०२३

 


ग्राम विकास विभागाचे उपसचिव श्री  पो. द. देशमुख यांनी दि १३ सप्टेंबर २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि.......... 

                  उपरोक्त विषयाबाबत जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण संदर्भाधीन दि. ०७/०४/२०२१ व दि.२३/०५/२०२३ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या सन २०२२ मधील बदल्या संगणक प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या आहेत.

२. आता शालेय शिक्षण विभागाने संदर्भाधीन दि. २१/०६/२०२३ च्या शासन निर्णयान्वये, सन-२०२२ मधील विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधीन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही करावी, असे निदेश आहेत. त्यानुषंगाने सन २०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते, परंतु आंतरजिल्हा बदलीप्रक्रीया राबवत असतांना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र ठरले होते. मात्र, रिक्त जागा अभावी ज्यांना बदली मिळाली नव्हती. फक्त अशाच सन २०२२ च्या बदली प्रक्रीयेमधील प्रतिक्षाधीन प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु करण्यात येत आहे. सदर बदली प्रक्रियेकरीता E.O. लॉगीन आज मध्यरात्री पासून सुरु करण्यात येणार असून मंजूर केलेली बिंदुनामावली अपलोड करण्याबाबतची कार्यवाही सर्व जिल्हा परिषदा यांनी दि.१४/०९/२०२३ ते दि.१७/०९/२०२३ या कालावधीमध्ये पूर्ण करावी.


अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.